बुधवार, १६ मार्च, २०११

पाणी व्यवस्थापन

उन्हाळा सुरु जाहला म्हणजे पाण्याची समस्या निर्माण होते. पाण्याचा वापर फार काटकसरीने करावा लागतो. कारण हिवाळ्याच्या शेवटी शेवटी विहिरी, बोअरवेल, नद्या,तलाव,धरणे आदी पाण्याचे साठे आटायला सुरवात होते. उन्हाळ्याचा सुरुवातीला याचा त्रास जाणवायला लागतो.नळाला येणारे पाणी फार जपून वापरावे लागते.या वेळी पाणी व्यवस्थापनची गरज वाटते.

पाण्याचे व्यवस्थापन पद्धतीचा वापर जर हिवाळ्याच्या सुरवाती पासून केला तर उन्हाळ्या मध्ये पाण्याची समस्या जरा कमी होते.कारण हिवाळ्याचा सुरवातीला नुकताच पावसाळा संपल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वर असते. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग करावे म्हणजे पडणारे पाणी घरच्या बोअरवेल,विहीर जवळ खड्डा करून गच्चीवर सर्व पाणी त्यात कसे साठवता येईल याची व्यवस्था करावी. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारे पाण्याचे व न्हाणी घराचे बाहेर पडणारे पाणी यांचे वेगवेगळे बाहेर काढावे. स्वयंपाक घरातील पाणी घरासमोरील लावलेल्या झाडांना द्यावे.न्हाणी घरातले पाणी सार्वजनिक नालीने बाहेर काढावे.

उन्हाळ्यांत कुलरचा वापर फक्त दुपारी करावा.रात्री अंगणात किंवा गच्चीवर झोपावे. अंगणातील झाडांची सावली दुपारनंतर घरावर येईल अश्या रीतीने झाडे लावावीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा